मोहदरी घाटात बर्निंग कारचा थरार

मोहदरी घाटात बर्निंग कारचा थरार

सिन्नर प्रतिनिधी

नाशिक -पुणे महामार्गावर मोहदरी घाटाच्या पायथ्याला उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला. पेट्रोल आणण्यासाठी गेलेला कारचालक परत येईपर्यंत कार जळून खाक झाली होती. रविवारी (दि.11) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
शुभम विलास चिटे (25, रा. शिवशक्ती हौसिंग सोसायटी, चंद्रेश्वर नगर, जुना सायखेडा रोड, जेलरोड, नाशिक रोड) याने याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात खबर दिली. चिटे हे टाटा टियागो कारने (एमएच. 15/एचजी 2297) बहिणीला घेण्यासाठी पुणे येथे गेलेला होता. तेथून परतत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याला हॉटेल कृष्णासमोर त्यांची कार बंद पडली. पेट्रोल संपले असावे असे समजून शुभमने बहिणीला नातेवाईकांसोबत घरी पाठवले. त्यानंतर पेट्रोल घेण्यासाठी तो पेट्रोलपंपावकडे गेला.
पेट्रोल घेऊन परतला असता त्याला कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली दिसली. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र कार जळून खाक झाली होती.  आगीचे कारण समजू शकले नाही. एमआयडीसी पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
Bhagwat Udavant

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

18 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

18 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

1 day ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

1 day ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

2 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

2 days ago