कसारा घाटात दुधाचा बर्निंग टँकर

इगतपुरी : प्रतिनिधी
कसारा बायपास जवळ मुंबईकडे दूध घेऊन जाणारा टँकर अचानक पेटल्याने खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला उभा करुन आपला जीव वाचविला. मुंबई येथे दुध घेऊन जाणारा टँकर चक – 17 इ ध – 3338) कसारा घाटात आला असता अचानक पेटला. चालकाने तातडीने प्रसंगावधान बघून गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून आपले प्राण वाचवले. ही घटना मुंबई-नाशिक एक्स्प्रेस वेचे गस्त पथक अधिकारी रवि देहाडे यांना समजली. त्यांनी तात्काळ गस्त पथक टीम सोबत घटनास्थळी पोहोचून सुरुवातीला मातीच्या साहयाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकल्याने दूध टँकरचे मागील लॉक तोडून सहकारी राजू उघडे , सचिन भडंागे यांच्या मदतीने 1 तासाच्या आटोकाट प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. या आगीमुळे वाहतुकीला एक तासभर खोळंबा झाला. याकामी कसारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिडके , रोंगटे यांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *