पेठ : प्रतिनिधी
तालुक्यातील जांबविहीर येथे आंघोळीसाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.समिर पवार (७) आपल्या आई-वडीलांसह आंघोळीसाठी गेला होता. तो पाण्यात आंघोळीसाठी उतरला असता त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.
त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला त्यानंतर या घटनेची माहिती मृत बालकाचे आजोबा रविंद्र पवार यांनी पेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. असता पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.