महाराष्ट्र

अजितदादांच्या वक्तव्यावर बावनकुळे,फडणवीसांचा पलटवार

70 हजार कोटींची सुनावणी अजून बाकी : महसूलमंत्री

पुणे :
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच राज्यात सत्तेत सोबत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या तू तू मैं मैं सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे तुम्हाला माहिती असेल. पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना, असा युक्तिवाद करत अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करणार्‍या भाजपच्या नेत्यांना कोंडीत पकडले आहे. त्यावर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीदेखील प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता याप्रकरणी भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजक्या शब्दातच अजित पवारांना डिवचले आहे.
आम्ही मागची पाने चाळली तर अजितदादांना बोलता येणार नाही, असा थेट इशारा बावनकुळेंनी अजित पवारांना दिला आहे. 70 हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, असेही ते म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले, की ठीक आहे, हे काही अभिमानास्पद नाही. न्यायालयात सुनावणी सुरू आहे, त्याचा काय निकाल येईल, त्यावर आपण पुढं जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे. अजून निकाल लागलेला नाही. अजितदादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणे आणि एका 0 हजार कोटींची सुनावणी अजून बाकी
महापालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करु नयेत, हे योग्य नाही. अजित दादा याचा विचार करतील. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित दादांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. महायुतीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असं बोलायचे नाही. असे महायुती समन्वय बैठकीत ठरलं होतं. तरी ते असं का वागले, असं का बोलले, याची मला कल्पना नाही. पण त्यांनी असं बोलायला नको होते. ते राज्यातील महत्वाचे नेते आहेत, मी त्यांना फार सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरेच वर्षे सत्तेत होते. आता आम्ही मागची पानं पलटली, चाळली तर त्यांना ही काही बोलता येणार नाही. त्यामुळे अजित दादांनी समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे वागावे, असा थेट इशारा त्यांनी अजित पवारांना दिला आह

Bawankule, Fadnavis counterattack on Ajitdada’s statement

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago