येवल्यात पतंग महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

बाजारपेठेत आकर्षक पतंग, दोरा, आसारी उपलब्ध; नायलॉन मांजावर बंदी कायम

येवला : विलास पगारे
मकरसंक्रांत सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्त येवला शहरात 13 ते 15 जानेवारी रोजी सलग तीन दिवस पतंग महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी येवलेकर सज्ज झाले आहेत. शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारचे आकर्षक पतंग, दोरा, आसारी विक्रीसाठी आले आहे. या सर्व साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे.
पतंग महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा मात्र नायलॉन मांजावर नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदी घालण्यात आल्याने पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर केला तर कडक कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनातर्फे शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. बर्‍याच छुप्या विक्रेत्यांना समज देण्यात आली.
काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने नायलॉन मांजाची होळी करण्यात आली. शहरातील नागरिकांचा सर्वांत आवडता मकरसंक्रांत सण असल्याने यानिमित्ताने शहरात सलग तीन दिवस पतंग उडवून हा सण मोठ्या धूमधडाक्यात अन् फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा करण्यात येतो. ही पतंग उडविण्याची परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि आजदेखील हा पतंग महोत्सव अधिक उत्साहात साजरा करण्यात येत असतोे. सलग तीन दिवस पतंग महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरातील कारागिरांकडून विविध प्रकारचे आकर्षक पतंग तयार करण्यात येत आहेत. तसेच सहापाती, आठपाती आसरी तयार करण्यात येत आहे. कारागिरांचे काम अंतिम टप्यात आहे. शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारचे आकर्षक पतंग, दोरा, अन् आसारी विक्रीला आले आहेत.
सदर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. पतंग, दोरा, आसारींचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढले असतानादेखील वाढलेल्या या महागाईचा विचार न करता पतंग महोत्सवात येवलेकर सहभागी होत असतात. मात्र, यंदा बांबू तुटवड्यामुळे पतंग 10 टक्क्यांनी महागले. अतिवृष्टीमुळे बांबू वाहून गेल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. मकरसंक्रांतीच्या पाच-सहा दिवस आधी ग्राहकांची पतंग दोरा अन् आसारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.

यंदा नायलॉन मांजाचा वापर करू नये

येवला शहरात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. येवलेकरांनी पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर करू नये. हा नायलॉन मांजा माणसे, पक्ष्यांना घातक आहे. पतंग उडविताना उत्सवप्रेमींनी साध्या दोर्‍याचा वापर करून पतंग महोत्सवाची मजा लुटावी, असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले आहे. पतंग उडविताना नायलॉन मांजाचा वापर झाल्यास कडक कारवाईचा इशारादेखील नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

 

Preparations for the kite festival in Yeola are in the final stages.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago