मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढत चालला आहे . फोटो , व्हिडिओ , ऑडिओ शेअर करण्यासाठी युझर फेसबुक , इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सना प्राधान्य देत आहेत . जगभरात रोज लाखो फोटो , व्हिडिओ या माध्यमातून शेअर केले जात आहेत . या प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढत असताना , दुसरीकडे हॅकर्स या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत . सर्वसामान्यपणे व्हिडिओ पाहण्यासाठी यू – ट्यूबचा सर्वाधिक वापर केला जातो ; पण आता यूट्यूबवर सर्चिंग करणं धोकादायक ठरू शकतं . कारण व्हॉट्सअॅप आणि गुगल प्ले स्टोअरवर मालवेअरच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर हॅकर्सनी यूट्यूबला आपलं लक्ष्य बनवलं आहे . यूट्यूबच्या माध्यमातून हॅकर्स युझरचे पासवर्ड , टेलिग्राम मेसेज आणि स्क्रीनशॉट चोरत असल्याचं दिसून आलं आहे . त्यामुळे तुम्ही यू – ट्यूबवर सर्चिंग करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे . यू – ट्यूबवर तुम्ही सातत्यानं नवीन व्हिडिओ सर्च करत असाल तर आता पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे . कारण हॅकर्सनी फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे . तुमच्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हॅकर्सनी चोरी करणारं पेनीवाइज नावाचं एक नवीन मालवेअर तयार केलं असून , त्याचा प्रसार करण्यासाठी यू – ट्यूबचा वाहक म्हणून वापर केला जात आहे . सायबर रिसर्च लॅबमधल्या सायबर संशोधकांनी पेनीवाइज मालवेअर शोधून काढलं असून , त्यातून यूट्यूबवरचे ८० पेक्षा जास्त व्हिडिओ उघड केले आहे . या व्हिडिओ तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी सक्षम आहेत .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…