सिडको : वार्ताहर
घराच्या छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेत एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उपेंद्र नगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उर्मिला आनंद चव्हाण (32,रा. रिंकी संकुल च्या बाजूला, प्रशांत लॉन्ड्री समोर, उपेंद्र नगर, नवीन नाशिक) या महिलेने (दि.१३) रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक अतुल बनतोडे करत आहेत. दरम्यान उर्मिला यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्या घरात त्यांचे दोन मुले होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…