गुळबाजार, सरदार चौक परिसर बंद; मनपा प्रशासनाच्या कारभारावर संताप
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या गंभीर प्रश्नांकडे महापालिका प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सार्वजनिक नागरी सुविधा समिती व गुळबाजार व्यापारी मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. 10) अनोखे भिक मांगो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा भाग म्हणून सरदार चौक व गुळबाजार परिसरातील मुख्य व्यापारीपेठ सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. महापालिकेला कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध होत असतानाही शहरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित का राहावे लागत आहे, असा संतप्त सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान रस्त्यावरील खड्ड्यात बसून व्यापार्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून महापालिकेला मदत (भिक) द्यावी, असे आवाहन करत अनोख्या पद्धतीने प्रशासकीय निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला.
प्रशासनाने आश्वासने न देता प्रत्यक्ष कामे वेळेत पूर्ण करावीत, अन्यथा बेमुदत बंद आणि अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात रामदास बोरसे यांच्यासह जितेंद्र देसले, कैलास तिसगे, हमीद वखारवाले, चेतन असेरी, नंदू पाटील आदी सहभागी झाले होते.
दोन कोटींचा सांडवा पूल धूळ खात!
अंदाजे दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला नवीन सांडवा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. या पुलावरून किमान दुचाकी व तीनचाकी वाहनांची वाहतूक तातडीने सुरू करावी, अशी जोरदार मागणी व्यापार्यांनी केली..
खड्डे, अस्वच्छता अन्? वाहतूक कोंडी
शहरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून महापालिकेने खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर पाच महिने उलटूनही पॅचवर्क केलेले नाही. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी व कचर्याचे साम्राज्य पसरले आहे.
बाजारपेठेत पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही आणि एकेरी वाहतूक नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने दररोज वाहतूक कोंडी होते. सुलभ शौचालयांची कमतरता, अपुरा पाणीपुरवठा तसेच मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा त्रास कायम आहे.
‘Begging protest’ in Malegaon against the poor state of amenities.
सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…