महिलेची 78 लाखांची फसवणूक
सातपूर : प्रतिनिधी
अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेचे ब्लॅकमेलिंग करून तिच्याकडून तब्बल 78 लाख रुपये तसेच 10 तोळे सोने घेतल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट 2020 पासून श्रमिकनगर परिसरातील सातमाऊली चौकाजवळील एका रो-हाऊसमध्ये हा प्रकार सुरू असल्याची फिर्याद महिलेने दिली आहे. पीडित महिला घरात एकटी असताना संशयित निलेश अशोक पगार (रा. उतराणे, नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक) याने घरात प्रवेश करून, आपल्याकडे महिलेचे निर्वस्त्र फोटो व व्हिडिओ असून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीचा आधार घेत संशयिताने महिलेवर दबाव टाकून सुमारे चार वर्षे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रमधील महिलेचे 11 सही केलेले कोरे धनादेश घेत तिच्या खात्यातून 16 लाख रुपये काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय वारंवार ऑनलाइन पद्धतीने 52 लाख रुपये आणि 10 लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे एकूण 78 लाख रुपये घेत फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयिताने महिलेच्या घरी येऊन तिच्या दोन मुलींशीही गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच महिलेच्या जवळील सुमारे 10 तोळे सोने घेत, दोन्ही मुलींना जीवे मारण्याची आणि महिलेची बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेशपुरी बुवा करीत आहेत.
Woman defrauded of ₹78 lakh after being threatened with the viral circulation of obscene photos and videos.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…