नाशिक

लाडक्या बहिणींचा शिक्षणमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

मानधनवाढ, विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन; न्याय देऊ ः भुसे

शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांना किमान वेतनवाढ करावी, विमा संरक्षण, कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, वर्षाला दोन ड्रेस(साड्या) देण्यात याव्यात यांसह विद्यमान कामगार संघटना अध्यक्ष शरद लोहकरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासह अन्य मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयटक व श्रमिक कामगार संघटनेतर्फे रविवारी (दि. 8) शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील बंगल्यावर मोर्चा काढण्यात आला.
पोलिसांनी मध्यस्थी करत हा मोर्चा बंगल्यावर न नेता भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर नेला. मंत्री भुसे यांनी महिलांशी सविस्तर चर्चा करून निवेदन स्वीकारले. याबाबत तत्काळ निर्णय घेतो, असे आश्वासन दिले.
प्रारंभी शालेय शिक्षणमंत्री भुसे यांच्या मालेगाव येथील बंगल्यावर मोर्चा काढला होता. मोसमपूल येथील महात्मा फुलेंच्या पुतळ्याजवळून हा मोर्चा काढला. तो रद्द करावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह पोलीस यंत्रणेने प्रयत्न केले. मात्र. आम्ही साहेबांच्या बंगल्यावर जाऊ, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. हतबल प्रशासनाने तत्काळ मंत्री भुसे यांच्याशी संपर्क साधला. महिला मोर्चा काढण्यासाठी ठाम असल्याचे सांगितले. यानंतर भुसे यांनी मी स्वतः तिथे येतो, असे सांगितले. भुसे आल्यानंतर त्यांनी महिलांना संपर्क कायार्र्लयात या, असे सांगितले. यानंतर मोर्चा संपर्क कार्यालयात आणण्यात आला. यावेळी कॉ. हिम्मत गवळी, अध्यक्षा संगीता सोनवणे व संजय जमधाडे यांनी भुसे यांच्याकडे गार्‍हाणे मांडले.

बहिणींना न्याय देणार : भुसे
मी महिनाभरापूर्वीच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली व शालेय पोषण आहार शिजवणार्‍या महिलांच्या मानधनात वाढ करण्याची विनंती केली. सध्या केंद्राकडून 600 रुपये देण्यात येतात. त्यात वाढ करण्याची विनंती केली आहे. त्यांनी शरद लोहकरे यांच्याबाबतीत जे गंभीर आरोप केले आहेत, त्याची शहानिशा करून, तसेच सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. माझ्या सर्व लाडक्या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

आम्ही विविध मागण्यांसाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर मोर्चा आणला होता. मात्र, पोलीस अधिकार्‍यांनी मध्यस्थी केली व मोर्चा संपर्क कायार्र्लयात न्यायला सांगितले. आम्ही तिथे गेलो. मंत्री भुसे यांच्याशी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली. त्यांनीदेखील न्याय देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
– संगीता सोनवणे, अध्यक्ष, आधारवड महिला संस्था

 

Gavkari Admin

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

2 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

3 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

4 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

4 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

4 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

5 days ago