माझा विश्वासघात केला, केसाने गळा कापला , केदा आहेर यांनी भाषणात आ. राहुल आहेरांना धु धु धुतले

माझा विश्वासघात केला, केसाने गळा कापला
केदा आहेर यांनी भाषणात आ. राहुल आहेरांना धु धु धुतले
काजी सांगवी :  वार्ताहर
माझा विश्वासघात केला, केसाने गळा कापला. जर उमेदवारी आधीच निश्चित केलेली होती तर पत्रकार परिषद घेऊन माघार घेण्याचे नाटक कशासाठी केले.मी रात्रंदिवस मेहनत करून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आणलं तो माणूस स्वतःच्या भावाला झाला नाही तर या जनतेला काय होईल जे दोन्ही तालुक्यांमध्ये मिरवून सांगत आहे की मी केला नानांना हे पद दिलं ते पद दिलं जिल्हा बँकेचे पद दिलं जिल्हा परिषदेत दिलं मार्केट दिलं हे पदे त्यांनी मला दिलेच नाही हे माझ्या जीवावर मी निवडून आलो उलट यांना मी दोन वेळेस आमदार केले तरी यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. फक्त स्वभाव भोळा दाखवायचा आणि मनात कपटीपणा. अशा तिखट शब्दांत केदा आहेर यांनी आ. राहुल आहेर यांच्यावर सडकून टीका केली.
चांदवड येथे मातोश्री लॉन्स या ठिकाणी चांदवड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. व केदा नाना तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे दिले केदा नाना तुम्ही थांबू नका यावेळेस निवडणूक लढा अशी भावनिक साद घालण्यात आली
यावेळेस केदा नाना यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांचे बंधू डॉक्टर राहुल आहेर यांच्यावर सडकून टीका केली. आपला स्वभाव भोळा दाखवून मनात वेगळं आणि डोक्यात वेगळं माझी खूप मोठी फसवणूक केली. मला वाटत नव्हतं की भाऊबंदकी माझ्या घरात पण असेल हे एवढ्या दोन-तीन दिवसात झालेल्या कटकारास्थानामध्ये मला समजले परंतु मी आज या जनतेच्या दरबारात आलो आहे या जनतेने मला सांगावे काय करायचे ते मी करणार या जनतेसाठी मी जीवाचे रान करीन अशा तिखट शब्दांमध्ये केदा नाना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच तालुक्यातील राहुल आहेर यांचे कार्यकर्ते हे त्यांना काही सुचू देत नाही त्यांनी पूर्णपणे त्यांना घेतला आहे सर्व गर्दी तेच करतात जनतेला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही तसेच त्या कोणाचेही कॉल उचलत नाही त्यांना कॉल करायचा असल्यास त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यामार्फत त्यांना कॉल करावा लागतो परंतु मी जर आमदार झालो तर एकाही नागरिकाला कोणत्याही कार्यकर्ता मार्फत मला माझ्याकडे येण्याची गरज नसणार स्वतः डायरेक्ट मला फोन करायचा माझ्याकडे यायचं आणि हक्काने काम सांगायचं हा केला आहे तुमच्यासाठी सदैव तत्पर असेल तुम्ही मला फक्त या वेळेस साथ द्या या विधानसभेचा आमदार मी नसून तुम्ही जनताच आमदार असेल अशी भावनिक साथ समोर असलेल्या जनतेला घालण्यात आली या मेळावा साठी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुनील शेलार योगेश साळुंखे प्रशांत ठाकरे अनिल ठोके सचिन निकम संजय महाराज शिंदे सरपंच सागर वसंत पगार तसेच असंख्य कार्यकर्ते व महिला पुरुष बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *