नाशिक

खबरदार! रस्ते खोदाल तर… आयुक्तांचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अठ्ठावीस रस्ते कामांचे नियोजन झाले आहे. काही ठिकाणी कामही सुरू झाले आहे. दरम्यान, या नवीन रस्त्यांसह शहरात कुठेही रस्ते खोदकामांना महापालिकेने निर्बंध घातले आहेत. खुद्द मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्ते खोदकामावरून
निर्देश देत वर्षभरात कुठल्याही नवीन कामांना परवानगी दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच विनापरवानगी कुणीही रस्ते खोदत असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त खत्री यांनी दिला आहे.
शहरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून एमएनजीएल, बीएसएनल, स्मार्ट सिटी आदींसह काही यंत्रणांकडून वारंवार रस्ते खोदण्याचे काम करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. मात्रस यापुढे शहरात रस्ते खोदण्यास ब्रेक लागणार आहे. आयुक्तांनी रस्ते खोदकामाची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख 29 रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि डांबरीकरणासाठी खोदाई सुरू झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने 250 किलोमीटर खोदकामाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे मनपाने परवानगी दिल्यास शहरवासीयांना अजून खडतर प्रवासाला सामोरे जावे लागेल.
एमएनजीएल कंपनीच्या गॅस पाइपलाइसह विविध मोबाइल कंपन्या, स्मार्ट सिटी कंपनीमार्फत टाकण्यात येणार्‍या ओएफसी केबलमुळे रस्ते खोदण्यात आले आहेत. रस्ते खोदण्याची परवानगी देताना मनपाने कोट्यवधी रुपये शुल्क आकारले. मात्र, खोदलेले रस्ते लवकर बुजविण्यात येत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे वाढत चालल्या आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कडक भूमिका घेतली आहे. आगामी एक वर्ष कोणत्याही विभागाला नवीन खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तंबी दिली आहे. तसेच सध्या सुरू असलेली सर्व खोदकामे तातडीने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. खोदकामानंतर रस्ते अर्धवट अवस्थेत सोडले जात असल्याने धूळ, चिखल, अपघात, वाहनांचे नुकसान, तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत मनपाकडे तक्रारींचा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित सर्व विभागांना सांगितले की, आधी सुरू असलेली सर्व खोदकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत. रस्ते पूर्ववत न केल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाई व दंडात्मक उपाय केले जातील. सिंहस्थ कुंभमेळा काळात व त्यापूर्वी नागरिकांना दिलासा देणे, हेच प्राधान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.

Beware! If you dig roads… Commissioner warns

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago