नाशिक

बसवंत गार्डनच्या पुष्पोत्सवास सुरुवात

पुष्प सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक : प्रतिनिधी
‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा.लि.’ संचालित बसवंत गार्डन (मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक) येथे दि. 23 ते 27 जानेवारीदरम्यान आयोजित पुष्पोत्सवाचे, तसेच पुष्प सजावट स्पर्धेची सुरुवात पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे आणि मुख्याधिकारी श्रिया देवचके या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. शेतकर्‍यांच्या दर्जेदार उत्पादनांची नागरिकांना ओळख व्हावी व योग्य बाजारपेठ मिळून त्यांचे मूल्यवर्धन व्हावे, या हेतूने जानोरी फ्लॉवर्सअंतर्गत बसवंत पुष्पोत्सव- उत्सव फुलांचा या उपक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, ग्रीनझोनचे कार्यकारी संचालक संजय पवार, बसवंत गार्डनचे प्रकल्प संचालक संदीप वाघ, संदीप सोनवणे, राज बागूल उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या पुष्पगुच्छ व पुष्प सजावट स्पर्धेत विविध वयोगटांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पुष्पगुच्छ स्पर्धेत प्रथम रु. 5001, द्वितीय रु. 3001, तृतीय रु. 2001, तर उत्तेजनार्थ तीन (प्रत्येकी रु. 1001). त्याचप्रमाणे पुष्प सजावट स्पर्धेत प्रथम रु. 5001, द्वितीय- रु. 3001, तृतीय- रु. 2001 आणि तीन उत्तेजनार्थ (प्रत्येकी रु. 1001) अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अवधूत देशपांडे यांनी केले. या पुष्पोत्सवाच्या शुभारंभाला तीनशेहून अधिक फूल उत्पादक शेतकर्‍यांसह अनेक पर्यटकांची उपस्थिती लाभली. 27 जानेवारी 2026 पर्यंत याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Baswant Garden’s flower festival begins

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago