निवडणूक आयोगाकडून इशारा
नाशिकरोड : प्रतिनिधी
महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकाच मतदाराने दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा मतदान केल्याचे दिसल्यास अशा मतदारांना आता कारावास आणि आर्थिक दंड, अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. तशी सध्या शहरात चर्चा असून, निश्चितच अशा दोनदा मतदान करणार्यांना निवडणूक आयोग कारवाई करून दणका देणार का, अशी चर्चा सध्या होत आहे.
राज्यभरात 15 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका व 20 डिसेंबर 2025 ला उर्वरित नगरपालिकांच्या प्रभागांतील उमेदवारांच्या निवडणूका होत आहेत. त्याबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह राहिलेल्या नगरपरिषद, नगरपालिका व मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकादेखील लवकरच होणार आहेत. ग्रामीण भागातील काही मतदारांची शहरातील प्रभागांतही नावे दुबार किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंद झाल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी मतदार गावाकडून शहराकडे स्थलांतरित झालेले असतात. गावासह अशा मतदारांची नावे नगरपालिका व महापालिका प्रभागातदेखील नोंदवलेली असतात. अशावेळी बरेच मतदार शहरातील महापालिका किंवा नगरपालिका क्षेत्रात मतदान करतात. पुन्हा गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही मतदानाचा हक्क बजावतात. या प्रकाराची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतल्याचे समजते.
अशावेळी मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्यक्ष मतदानाच्या नोंदीसह इतर बाबी लक्षात घेऊन सक्षम पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. गावात किंवा शहरात दुबार मतदान करणे किंवा दोन्ही ठिकाणी मतदान करणे आता शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे. दुबार मतदान केल्याचे स्पष्ट झाल्यास निवडणूक कायदा 1951 नुसार थेट जेलची हवा खाण्यासह दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे दुबार मतदान करणार्यांना मोठा चाप बसणार आहे. सर्वच निवडणुका स्वच्छ, निष्पक्ष आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्राधान्य दिले आहे. सर्व नागरिकांनी जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावावा. कोणत्याही गैरप्रकारात सहभागी न होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
Beware! If you vote twice, you will have to go to jail.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…