नाशिक

चांदवडचा नवा कारभारी कोण? उद्या होणार फैसला!

सात फेर्‍यांत होणार मतमोजणी; दोन तासांत चित्र होणार स्पष्ट

चांदवड : वार्ताहर
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चांदवड नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाचा काउंटडाउन सुरू झाले आहे. येत्या रविवारी (दि. 21) होणार्‍या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अवघ्या सात फेर्‍यांमध्ये शहराच्या सत्तेचा फैसला होणार आहे. विशेष म्हणजे पाच टेबलांवर समांतर मोजणी होणार असल्याने अवघ्या दोन तासांत विजयाचा गुलाल कोण उधळणार, याचे चित्र स्पष्ट होईल.
नगरपरिषदेच्या सत्तेसाठी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर आता सर्वांची धाकधूक वाढली आहे. मतमोजणी प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोजणीसाठी पाच स्वतंत्र टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मोजणी सात फेर्‍यांमध्ये पूर्ण केली जाईल. वॉर्डनिहाय मोजणीमुळे नगरसेवक पदाचे निकाल टप्प्याटप्प्याने आणि लवकर हाती येतील. मात्र, नगराध्यक्षपदाचा निकाल सर्व सात फेर्‍यांची मोजणी पूर्ण होऊन अधिकृत गोळाबेरीज झाल्यानंतरच अंतिम स्वरूपात घोषित केला जाईल.
रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच अवघ्या दोन तासांत निकालाचा मुख्य ओघ समोर येईल. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखली जावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही पारदर्शक प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयाचे गणित मांडणार्‍या उमेदवारांचे आणि समर्थकांचे भवितव्य रविवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार असल्याने, संपूर्ण चांदवड शहरात सध्या काय होणार? याचीच चर्चा रंगली आहे.

प्रभाग 3 अ साठीआज मतदान
प्रभाग 3 मधील ’अ’ जागेसाठी आज, दि. 20 डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. या एका जागेसाठी पंचरंगी लढत होत असून, रिंगणात चार अधिकृत पक्षांचे आणि एक अपक्ष, असे एकूण पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आजच्या मतदानानंतर या पाचही जणांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. मुख्य मतमोजणीतच या जागेचाही निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या प्रभागातील मतदारांचा कल कोणाकडे, याची मोठी उत्सुकता आहे.

Who is the new steward of Chandwad? The decision will be made tomorrow!
Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago