सावधान! व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून अकाउंट होऊ शकते हायजॅक

केंद्रीय गृहमंत्रालयाचा यूजर्सना धोक्याचा इशारा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेने इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर (आयफोरसी) आणि त्याच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट नालिटिक्स युनिटने पडव्हायझरी जारी केली आहे. यात स्पष्ट इशारा दिला आहे की, व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लॉगिन असलेले अ‍ॅक्टिव्ह सेशन सायबर गुन्हेगारांसाठी तुमच्या अकाउंटचे उघडे दार ठरू शकते.
ऑफिसच्या कॉम्प्युटरवर, शेअर्ड सिस्टमवर, सायबर कॅफे, हॉटेलच्या बिझनेस सेंटरमध्ये, पब्लिक कियोस्कवर किंवा दुसर्‍याच्या उधार घेतलेल्या लॅपटॉपवर जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वेब लॉगिन करून तसेच सोडले, तर गुन्हेगार तुमचे प्रायव्हेट मेसेज वाचू शकतो, तुमच्या नावाने तुमच्या कॉन्टॅक्ट्सना, ग्रुप्सना मेसेज पाठवू शकतो, तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट-ग्रुप चॅट्स पाहू शकतो. तुमच्या ओळखीचा विश्वास वापरून फसवणूक, फिशिंग आणि सोशल इंजिनिअरिंग केले जाऊ शकते.
सवार्ंत धोकादायक गोष्ट म्हणजे, फक्त ब्राउझरची टॅब किंवा विंडो बंद करणे म्हणजे लॉगआउट होणे नव्हे! सेशन तसेच अ‍ॅक्टिव्ह राहते. म्हणून प्रत्येक वेळी मॅन्युअली लॉगआउट कराच.

थेट गृहमंत्रालयाचा सल्ला
कायम लॉगिन ठेवू नका : ऑफिस किंवा शेअर्ड कॉम्प्युटरवर व्हॉट्सअ‍ॅप वेब कायम लॉगिन ठेवणे टाळा, काम झाले की लगेच लॉगआउट करा. संवेदनशील माहिती नकोच : व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून सरकारी, कार्यालयीन, आर्थिक, गोपनीय किंवा संवेदनशील माहिती पाठवू नका. संस्थांनीही अधिकृत-संवेदनशील कामासाठी व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरू नये. अनोळखी कॉम्प्युटर टाळा : सायबर कॅफे, पब्लिक कियोस्क, हॉटेल बिझनेस सेंटर, उधारचा लॅपटॉप इथे लॉगिन करूच नका. अपरिहार्य असेल तर : फक्त विश्वासार्ह कॉम्प्युटरवर, इन काँग्निटो, प्रायव्हेट ब्राऊझिंग मोडमध्ये वापरा आणि नंतर मॅन्युअली लॉगआउट करा. सावध राहा : तुमच्या अकाउंटवरून न पाठवलेले मेसेज गेले, कॉन्टॅक्ट्सकडून विचित्र रिप्लाय आले, अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी दिसली तर ती गांभीर्याने घ्या. फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘लिंक्ड डिव्हायसेस’मध्ये जाऊन अनोळखी डिव्हाइस ताबडतोब काढून टाका.2

Beware! Your account could be hijacked via WhatsApp Web

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *