देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
भगूर नगरपरिषदेने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 69 कोटी 45 लाख रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.
या अंदाजपत्रकात शहरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा, दिव्यांगजन कल्याण, महिला व बालकल्याण योजना तसेच नगरपरिषद सफाई कामगारांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. नमो उद्यान, दारणा नदी किनारी घाट, स्मशानभूमी विकास, वीर सावरकर उद्यान, शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजना, रस्ते, भुयारी गटार व मलनिस्सारण केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांसाठी निधीचा समावेश करण्यात आला आहे. मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल व लेखा विभागाने अंदाजपत्रक सादर केले. या बैठकीस उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रसाद आडके, बांधकाम सभापती काकासाहेब देशमुख, स्वच्छता व आरोग्य सभापती सुधेश वालझाडे, महिला व बालकल्याण सभापती लता थापेकर उपस्थित होते.
चर्चेनंतर विविध सूचनांसह अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.
दुपारी 12 वाजता विशेष सर्वसाधारण सभेत लेखाधिकारी सोमनाथ देवकाते व लेखापरीक्षक निखिल हांडोरे यांनी अंदाजपत्रकाचे सविस्तर वाचन केले. यानंतर उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक दीपक बलकवडे व काकासाहेब देशमुख यांनी सूचना मांडल्या. स्थायी समितीने मंजूर केलेले अंदाजपत्रक विशेष सभेत जसेच्या तसे सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
मंजूर अंदाजपत्रकानुसार कर व करेतर उत्पन्न, महसुली अनुदान व अंशदाने यामधून अंदाजे 8.97 कोटी महसूल अपेक्षित असून, त्यापैकी 8.73 कोटी खर्च आरोग्य, स्वच्छता, महिला व बालकल्याण आणि इतर नागरी सुविधांवर करण्यात येणार आहे. तसेच भांडवली विकासकामांसाठी शासनस्तरावरून 48.80 कोटी निधी प्राप्त करण्याची तरतूद असून, एकूण 55.60 कोटींचा भांडवली निधी खर्च करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 69.45 कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करून भगूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार नगरपरिषदेने व्यक्त केला आहे.
Bhagur Municipal Council approves annual budget of Rs 69.45 crore
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…