नाशिक

भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाला जल्लोषात प्रारंभ; रथातून मुखवट्याची मिरवणूक

कावडीधारकांचे पूजन, प्रसाद वितरण; आज कुस्त्यांच्या दंगलीने यात्रेचा समारोप

सिन्नर : प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवाला बुधवारी (दि.1) पहाटेपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्ताने भैरवनाथ महाराजांच्या मुखवट्याची रथातून तसेच गंगाजलाच्या कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दोन दिवस चालणार्‍या या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे काही काळ मिरवणुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. पाऊस थांबताच मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.
गुरुवारी (दि.2) सायंकाळी 5 वाजता बाराद्वारी येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले असून त्याने यात्रेचा समारोप होणार आहे.
बुधवारी सकाळी 6 वाजता मंदिर परिसरात रथ पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात रथ व कावडी शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरविण्यात आले. रथाला श्रीफळ वाढवून दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वारकरी भजनी मंडळांच्या दिंड्यांनी मिरवणुकीत भक्तिरंग भरला.
येथील पाचोरे घराण्याकडे रथ हाकण्याचा मान होता. रथाच्या दोन्ही बाजूंना भालदार-चोपदार उभे राहून देवाच्या मूर्तीस चौराने वारा घालत होते. बैलांचा खांदा जोत्याला लावून रथ ओढण्यासाठी शेतकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. घराघरातून रथावर नारळ वाढवण्याची परंपराही यावेळी पार पडली. शहरातील विविध चौकांमध्ये तरुण मंडळांनी कावडीधारकांसाठी अल्पोपाहार व सरबताची व्यवस्था केली होती. रथामागे चालणार्‍या भाविकांना प्रसाद व पाणी वाटप करत सेवाभाव जपला गेला.

कावडीधारकांच्या हाती जनजागृतीचे फलक

रथामागे कावडीधारक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. सुवासिनींनी त्यांच्या पायांचे पूजन करून स्वागत केले. कावडीधारकांना गूळ-खोबरे, पेढे, खडीसाखर,
फुटाणे असा प्रसाद देण्यात आला. काही कावडीधारकांनी जनजागृतीचे फलकही हातात घेतले होते. ढग्या डोंगर संवर्धन समितीनेही पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

आतषबाजीने सजला यात्रेचा पहिला दिवस

रथ मिरवणूक मंदिरात परतल्यानंतर देवाचा मुखवटा मंदिरात ठेवण्यात आला. रात्री मंदिर परिसरात शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली.

Bhairavnath Maharaj Yatrotsav begins with joy; Mask procession from chariot

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago