नाशकात अजून एक सेक्स कांड

टॅब चोरी करून अश्लील डेटा हाती; खंडणीसाठी रचला कट

सातपूर पोलिसांची ५ तासांत थरारक कारवाई, १२ लाखांची मागितली खंडणी

 

सातपूर: प्रतिनिधी

सातपूर परिसरात अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीचा सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत पर्दाफाश करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे.
ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी फिर्यादीचा एक टॅब चोरी करून त्यामधील मैत्रीणीसोबतचे वैयक्तिक आणि संवेदनशील अश्लील व्हिडिओ व फोटो मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील दहा हजार रुपये नुकतेच देण्यात आले होते. तर गुरुवारी (दि.२) सायंकाळी ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र संशयित टोळी पैसे स्वीकारतानाच पोलिसांच्या हाती लागली आरोपींनी दबाव टाकण्यासाठी फिर्यादीकडून १० हजार रुपये उकळले आणि त्यांचे काही व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकी अधिक यांना बेड्या ठोकल्या आहे या घटनेप्रकरणी आकाश पुंडलिक बकरे (२८) रा. सातपूर, प्रकाश रामदास पानपाटील (२५) रा. सातपूर, सुरज गवई (२७) रा. मोतीवाला कॉलेज सातपूर आणि श्रीपत भिमराव शिंदे (३८) रा. खंबाळे ता. त्र्यबंकेश्वर यांनी केलेल्या कृत्य गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण अहिरे यांनी तात्काळ पोलिस आयुक्त, पोलिस उपआयुक्त व सहाय्यक आयुक्तांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस ठाणे आणि गुन्हेशाखा युनिट-२ अशी दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी आडगाव शिवारातील ‘दहावा मैल’ परिसरात लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चारी बाजूंनी घेराव घालत सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किशोर काळे व सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहीफळे करत असून, या प्रकरणात आणखी आरोपी किंवा इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago