लासलगाव : प्रतिनिधी
देवगाव मंडळ कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लावलेल्या सापळ्यात भरवस तलाठी कार्यालयातील कोतवाल लक्ष्मण फकिरा वैराळ
यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकाने पकडले आहे
तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच मागितली होती. त्यावर त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी ही कारवाई केली.कोतवाल लक्ष्मण फकिरा वैराळ यांच्यावर (दि.25 ) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची निफाड तालुक्यातील दहेगाव येथील वडिलोपार्जित शेत जमिनीचे खाते वाटप आदेश तहसील कार्यालय निफाड यांचेकडून प्राप्त झाले होते.त्या आदेशाची नोंद तलाठी दप्तरी सात बारा उताऱ्यावर घेऊन नोंद मंजूर करण्यासाठी भरवस तलाठी कार्यालयातील कोतवाल लक्ष्मण फकिरा वैराळ यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली केली होती.याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारीची शहानिशा झाली असता आज (दि.२५) सापळा रचण्यात आला. तीन हजार रुपये स्विकारताना वैराळ यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे,पोलीस नाईक प्रभाकर गवळी, शरद हेंबाडे,संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…