जऊळके दिंडोरी येथील कंपनी आगीत भस्मसात
दिंडोरी: प्रतिनिधी
तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथे काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत लाखोचा माल भस्मसात झाल्याची घटना पहाटे घडली आहे. जउळकेदिंडोरी येथील सरस्वती नगर मधील संदेश किशोर गुप्ता यांच्या मालकीचे रेखान ऍग्रो या काजू प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला आज शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत लाखोचा कच्चामाल जळाल्याची घटना घडली.आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली .जानोरी चे कामगार तलाठी किरण भोये व दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड करीत आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…