उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना राष्ट्रपती पोलिस पदक
नाशिक – प्रतिनिधी
शहर पोलिस दलातील उपनिरीक्षक दत्तात्रय राजाराम कडनोर यांना विशेष सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. कडनोर सध्या मध्यवर्ती गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज या पदकांची घोषणा करण्यात आली, उपनिरीक्षक कडनोर हे पोलिस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून १ जून १९९१ ला भरती झाले आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबईनाका पोलीस स्टेशन व मध्यवर्ती गुन्हेशाखा येथे नोकरी करीत असतांना त्यांनी खून, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्हयांची उकल करून तपासकामी मदत केली आहे.
नाशिकरोड पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना १५ गावठी पिस्तोल, भद्रकाली पोलीस ठाणे येथे ६५ मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या गुन्हयांच्या तपासापैकी १२ गंभीर गुन्हयांत आरोपीतांना शिक्षा झालेली आहे. पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरी करीता सन २०१७ मध्ये पोलीस महासंचालक यांनी पदक व प्रशंसापत्र देउन सन्मानित केले आहे. पोलीस दलात कामगिरी करतांना अनेक गंभीर गुन्हयांची उकल, एम.पी.डी.ए. व मोक्का सारख्या कारवाया करून चेन स्नाचिंग, मोटारसायकल चोरी या गुन्हयांत लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
आतापर्यंत तब्बल इतकी बक्षीसे
उपनिरीक्षक कडनोर यांची एकुण सेवा ३२ वर्षे ७ महिने झालेली असून त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांचेकडून उत्कृष्ट कामगिरी बद्दल ३७७ बक्षिसे व ३५ प्रशंसापत्र मिळाले आहेत. या केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेची केंद्रशासनाने दखल घेत राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…
View Comments
Yes he deserves