15 पैकी 15 जागांवर विजय; दोन दशकांची हिरे गटाची सत्ता संपुष्टात
मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या मालेगाव शेतकी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 15 जागांवर विजय मिळवत संघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निकालामुळे माजी मंत्री प्रशांत हिरे व भाजपचे युवा नेते अद्वय हिरे यांच्या गटाची तब्बल दोन दशकांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे.
शेतकी संघाच्या 15 जागांसाठी रविवारी मतदान पार पडले होते. सोमवारी (दि. 22) भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक जितेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण झाली आणि अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
या निवडणुकीत दादा भुसे समर्थित शेतकरी विकास पॅनल आणि अद्वय हिरे समर्थित जनशक्ती पॅनल यांच्यात थेट लढत झाली. मात्र, निकालात शेतकरी विकास पॅनलने एकतर्फी विजय मिळवत सर्व 15 जागा आपल्या नावावर केल्या. हिरे गटाला 15 पैकी केवळ 9 जागांवर उमेदवार उभे करता आल्याने निवडणुकीचा कल सुरुवातीपासूनच भुसे गटाच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. निकाल जाहीर होताच भुसे समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी योगिता खैरनार, शेतकी संघाचे प्रशासक स्वप्नील मोरे, सहकार अधिकारी संदीप अहिरे, प्रतीक वाकचौरे आणि दीपक अहिरे यांनी सहकार्य केले.
हिरे गटाला पहिल्यांदाच मोठा धक्का
मालेगाव शेतकी संघाच्या स्थापनेपासून या संस्थेवर हिरे गटाचे वर्चस्व राहिले होते. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर दादा भुसे गटाने आखलेल्या रणनीतीमुळे हिरे गटाला प्रथमच मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालाने तालुक्याच्या राजकारणातही नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
विजयी उमेदवार
सहकारी संस्था गट : आत्माराम आधार अहिरे, सुभाष सोनु गिल, सचिन एकनाथ साळुंके, ईश्वर महादू सिसोदे, दिनकर महादू चव्हाण आणि आकाश मधूकर हिरे.
वैयक्तिक गट : मधूकर देवमन देवरे, विजय लहु निकम, रविंद्र बळीराम शेवाळे आणि मयुर केवळ हिरे.
महिला राखीव गट : मंगला धर्मा भामरे आणि पुष्पा मुरलीधर शिंदे.
ओबीसी गट : अनिल देवराम निकम.
अनुसूचित जाती-जमाती गट : बाळू खंडू ठाकरे.
विमुक्त जाती-भटक्या जमाती गट : प्रदीपकुमार नवलसिंग पवार.
Bhuse faction hoists its saffron flag over the Malegaon Agricultural Cooperative Society.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…