बिबट्याच्या हल्ल्यात मजूर युवकाचा मृत्यू
नाशिक : प्रतिनिधी
दोन दिवसापासुन बेपत्ता असलेल्या मजूर युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गिरणारे येथे घडली.
दिलीप काशिनाथ थेटे (रा गिरणारे) यांच्या शेतात मालकी गट न 354 मध्ये बि बट्याने अरुण हिरामण गवळी (वय 27,रा अलिवपाडा हर्सूल) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. यांना ठार केले. दरम्यान सदर युवक दोन दिवसापासुन बेपत्ता होता. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात संबधितांचा मृत्यू झाल्याचे समीर येत आहे. याप्रकरणी वन विभागाला माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला.