दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप

मनपाकडे 172 मूर्तींचे संकलन

नाशिक : प्रतिनिधी
शहरात मोठ्या उत्साहात सोमवारी (दि. 14) लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला मंगळवारी (दि.15) भावपूर्ण वातावरणात गणेशभक्तांनी निरोप दिला. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने तयारी केली होती. मंगळवारी 172 गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले आहे.
शहरात दीड दिवसाने, पाच दिवसांनी व अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशविसर्जन केले जाते. यात चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन सर्वाधिक केले जाते. शहरातील नवीन नाशिक व नाशिक पूर्व या दोन विभागांतून दीड दिवसाच्या बाप्पाची एकही मूर्तीचे संकलित झाली नाही. महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी सहाही विभागांत विसर्जन हौद, लोखंडी टाक्या, निर्माल्य संकलन केंद्रे, मूर्ती संकलन केंद्रे यांसह जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात केली आहे. नदीपात्रातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शहरातील प्रमुख घाटांवर अग्निशमन विभागाचीदेखील सुरक्षा व्यवस्था असणार आहे. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यानुसार सहा विभागांत 172 मूर्तींचे संकलन झाले आहे.

विभागानुसार मूर्ती संकलन माहिती
पंचवटी                      79
नवीन नाशिक            00
सातपूर                      26
नाशिक पूर्व                00
नाशिक रोड               15
नाशिक पश्चिम        52
एकूण मूर्ती संकलन  172

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *