नाशिक

मिलरला अडकून दुचाकीस्वार ठार

मुकणे : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण करणार्‍या पाडळी देशमुखजवळील सीडीएस कंपनीबाहेर रस्त्यावर सिमेंट मिक्सिंग करणार्‍या मिलरने दुचाकीस्वाराला फरपटत नेले. यावेळी कमरेवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम करणार्‍या सीडीएस कंपनीत मटेरिअल घेऊन येणार्‍या मिलरने दुचाकीस्वार सोमनाथ गंगाराम खडके (वय 20, रा. पिंपळगाव भटाटा) यास फरपटत नेले. यावेळी कमरेवरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.
वाघोबावाडीकडून महामार्गाकडे दुचाकीने (एमएच 15- सीबी 4628) सोमनाथ जात असताना मिलरला (एमएच 15-जेडब्ल्यू 1489) तो अडकला होता. या घटनेनंतर मिलरचालक व कंपनीतील कामगारांनी तेथून पळ काढला. मृत सोमनाथचे काका गोविंद हंबीर, नारायण हंबीर व मावसभाऊ सागर हंबीर यांनी मृताच्या कुटुंबाला मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. नरेंद्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी घटना समजताच घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago