नाशिक

वारी पंढरीची… लगबग रथ पुष्प सजावटीची

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर रथयात्रेसाठी सजावट मंडळे सज्ज

माडसांगवी : वार्ताहर
वारी पंढरीची.. तयारी रथ सजावटीची. श्रीक्षेत्र त्र्यंंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर रथयात्रेसाठी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी सोहळा 10 जूनला मार्गस्थ होत आहे. पायदिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात. यंदा महिलांसह तरुण मंडळींचाही सहभाग लक्षणीय राहणार आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन झाले असून, नंबरप्रमाणे दिंडीचालक वारकरी टाळ, मृदंग, पताका खांद्यावर घेऊन मार्गस्थ होतील. ठिकठिकाणी मुक्कामाचे नियोजन, जेवण पंगत, झोपण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा याबाबत अगोदरच नियोजन केले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांचा चांदीचा रथ पालखी सोहळा मंगळवारी (दि. 10) दुपारी दोनला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघणार आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत सुमारे 27 दिवस निरनिराळ्या मंडळांकडून आणि सांप्रदायिक भाविकांकडून चांदीच्या रथ, पालखीची दररोज विविध प्रकारे व सुगंधित फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात येते. यासाठीचे नियोजन रथ सजावटप्रमुख हभप संजय तांबे, शिवाजी गायखे, ज्ञानेश्वर दाते, ज्ञानेश्वर गायखे, दशरथ पेखळे यांनी केले आहे.
यात्रामार्गात रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी दररोज निरनिराळी भाविक मंडळी आदल्या रात्री पोहोचून सुंदर सजावट करतात. रथ सजावटीनंतर याच मंडळींकडून नाथ महाराजांच्या पालखीचे पूजन झाल्यानंतर रथावर ठेवली जाते. रथ सजावट मंडळांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येते. परतीच्या प्रवासातही रथ सजावट करण्यात येते. अजूनही इच्छुक मंडळे सजावटीसाठी सहभागी होऊ शकतात. रथ सजावटीसाठी कैलास माळी, सुशील कुलकर्णी, शरद गायखे, संतोष ढमाले, योगेश बोराडे, साहेबराव राजगुरू, सुभाष काठे, राजू महाले, राजेंद्र घुमरे, पप्पू निकम, संजय तांबे, अरुण बिडवे, काबू गुलदगड, रावसाहेब शिर्के, बी. टी. पवार, कैलास वाघ, दीपक जाधव, अरुण मुंडे, हभप कांचनताई जगताप, श्रावण महाराज जगताप, समस्त ग्रामस्थ दुगाव, वरवंडी, शिवनई, शेवगेदारणा, उंबरखेड, पिंपळणारे, तसेच जय बाबाजी मित्रमंडळ माडसांगवी, परफेक्ट कृषी मार्केट नाशिक, संत निवृत्तिनाथ महाराज पतसंस्था चिखली, जय हरी परिवार सामनगाव, शिवशंभो प्रतिष्ठान आडगाव आदींसह शेकडो वारकरी सांप्रदायिक मंडळी तन-मन-धनाने या रथ सोहळ्यात सहभागी होऊन संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज रथ पुष्प सजावटीचा आनंद लुटतात.

रथ सजावट दृष्टिक्षेपात…
दोन दशकांपेक्षा अधिक जुनी रथ सजावट अखंडित परंपरा.
स्व. हभप शिवाजी महाराज पेखळे माडसांगवी यांची 20 वर्षांपासून पुष्प सजावटीची संकल्पना.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंत आणि परतीच्या मार्गावर दररोज मुक्कामस्थळी पुष्प सजावट.
दररोज हजारो रुपयांचे पुष्प वापरून सुशोभीकरण.
मध्यरात्रीपासून सकाळी सहापर्यंत नव्याने पुष्प सजावट.
सजावटीसाठी सांप्रदायिकप्रेमी मंडळे स्वतःहून सहभागी
होऊन स्वखर्चातून दररोज निरनिराळ्या प्रकारची रथ सजावट करतात.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago