नाशिक महापालिका निवडणुकीत सिडको परिसरामध्ये काय घडणार, याची नेहमीच चर्चा होत असते. यंदाच्या निवडणुकीची असेच घडले. याला कारण म्हणजे सिडको परिसरात कोणत्याही एका पक्षाचे प्राबल्य आहे असे म्हणता येणार नाही. तरीही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आपल्याच पक्षाचे प्राबल्य आहे, असे ठासून सांगतात. मात्र, कामगारबहुल वस्ती, मध्यमवर्गीय नोकरदार, नववसाहती, सिडकोची मोठी वसाहत, विविध कॉलनी त्याचप्रमाणे अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून असलेला परिसर आणि मळे परिसरातील स्थानिक रहिवासी, तसेच बाहेरून पोटापाण्यासाठी आलेले कामगार अशा प्रकारे मिश्रवस्ती असलेल्या या भागांत कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व नाही असेच दिसून येते.
दीपक दातीर (15,202)
वैभव महाले (7,867)
प्रतिभा पवार (11,214)
शीतल भामरे (11,034)
सुवर्णा मटाले (12,832)
माधवी सूर्यवंशी (7,656)
शरद फडोळ (9,590 )
संदीप पाटील (6,873 )
प्रभाग 28 मध्येदेखील भारतीय जनता पक्षाने आपले संपूर्ण पॅनल यावे म्हणून सर्व प्रकारची खेळी केली. त्याला तोडीस तोड शिवसेना शिंदे गटानेदेखील प्रचाराचे रान उठविले होते. मात्र, तरीही या प्रभागात दोन्हीही तुल्यबळ पक्षांना संपूर्ण पॅनल निवडून आणता आले नाही. याउलट मतदारांनी दोन्ही पक्षाला समसमान म्हणजे प्रत्येकी दोन-दोन जागा देऊन दोघांच्या पारड्यात समसमान आपल्या मतदारांनी मतांचे दान टाकले, असे दिसून येते.
खरेतर महापालिका निवडणुका तब्बल आठ वर्षांनी झाल्याने सिडकोच्या प्रभाग 28 मध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रत्येकाला उमेदवारी हवी होती, जिंकून यायचे आहे, या आशेवर गेल्या तीन वर्षांपासून निवडणूक होईपर्यंत मागील पंचवार्षिकमधील विद्यमान नगरसेवक आणि नव्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी स्वपक्षीयांसह विरोधी पक्षांतील अनेकांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, काहींचे प्रयत्न असफल झाल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यात काही जण यशस्वी झाले, तर काहींना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे या प्रभागात भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये सामना होणार, हे स्पष्ट झाले होते. त्याचवेळी शिवसेना उबाठा पक्षाकडूनदेखील जोरदार प्रचार सुरू होता. मात्र, सिडकोतील प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटाने प्रत्येकी दोन जागा जिंकत ताकद सिद्ध केली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर सुवर्णा मटाले व प्रतिभा पवार यांना तिसर्यांदा संधी मिळाली. विशेष म्हणजे, प्रतिभा पवार या शीतल भामरे यांच्यापेक्षा (अत्यंत कमी फरकाने) केवळ 180 मते जास्त मिळवून विजयी झाल्या आहेत. हे या प्रभागातील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रभाग 28 मध्ये डीजीपीनगर-2, उपेंद्रनगर, शुभम पार्क, फडोळ मळा हा परिसर समाविष्ट आहे. येथे परंपरेने बहुपक्षीय लढती होतात. मात्र, यंदा शिवसेनेतील फूट व स्थानिक पातळीवरील समीकरणांमुळे निकाल वेगळे लागले.
प्रभागातील अ गटात शिवसेना शिंदे गटाचे दीपक दातीर व भाजपचे वैभव महाले यांच्यात थेट लढत झाली. मात्र, ती कागदावरच मर्यादित राहिली. दातीर यांनी तब्बल 15 हजार 202 मते मिळवत महाले (7 हजार 867) यांचा पराभव केला. मनसेचे कैलास मोरे (3 हजार 9) व माकपचे मनोज आहेर (1 हजार 872) यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्याचप्रमाणे ब गटात भाजपच्या प्रतिभा पवार व शिवसेना शिंदे गटाच्या शीतल भामरे यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. पहिल्या फेरीत अवघ्या 55 मतांची आघाडी मिळाल्यानंतर पवार यांच्या समर्थकांत धाकधूक होती. मात्र, तिसर्या आणि अंतिम फेरीअखेर प्रतिभा पवार यांनी 11 हजार 214 मते मिळवत शीतल भामरे (11 हजार 34) यांचा केवळ 180 मतांनी पराभव केला. या विजयामुळे भाजपने प्रभागात आपली जागा राखली. क गटात शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा मटाले यांनी 12 हजार 832 मते मिळवत भाजपच्या सीमा वाघ (7 हजार 216) आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माधवी सूर्यवंशी (7 हजार 656) यांचा पराभव केला. ड गटात भाजपचा नवा चेहरा असलेल्या शरद फडोळ यांनी 9 हजार 590 मते मिळवत शिवसेना शिंदे गटाचे संदीप पाटील (6 हजार 873), उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी (6 हजार 168), दिलीप दातीर (4 हजार 469) या प्रतिस्पर्ध्यांंचा पराभव केला. सूर्यवंशी हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असून, त्यांचा पराभव प्रभागात चर्चेचा विषय ठरला.
वास्तविक पाहता निवडणूक असो किंवा नसो मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवल्याचा परिणाम या प्रभागातील मतदानावर दिसला. शिवसेना व भाजपला समसमान मतदान मतदारांनी केले. या प्रभागात सुवर्णा मटाले, दीपक दातीर व प्रतिभा पवार या तीन अनुभवी चेहर्यांना मतदारांनी संधी दिली. तिघांच्या अनुभव शरद फडोळ या नवख्या उमेदवाराचा जनसंपर्क यामुळे मतदारांनी अनुभव व जनसंपर्काची सांगड घातली. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी सूर्यवंशी यांचा पराभव शिवसेनेसाठी (उबाठा) धक्का देणारा ठरला. शिवसेनेला संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची महत्त्वाकांक्षा या प्रभागात पूर्ण करता आली नाही.
प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिंदेसेनेचे दोन आणि दोन भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. यात शिंदेसेनेचे दीपक दातीर, सुवर्णा मटाले, तर भाजपचे शरद फडोळ व प्रतिभा पवार हे विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 28 मध्ये अ गटातून भाजपाचे वैभव महाले आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक दातीर आमनेसामने होते. ब गटातून प्रतिभा पवार आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल भामरे, क गटातून भाजपाच्या सीमा वाघ आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा मटाले, तर ड गटातून भाजपाचे शरद फडोळ आणि महाविकास आघाडीचे डी. जी. सूर्यवंशी यांच्यात लढत झाली आहे.
विशेष म्हणजे, याच प्रभागातून सुवर्ण मटाले आणि प्रतिभा पवार या दोन वेळा विजय झाल्या असून, आता दोघीही तिसर्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. दीपक दातीर आधी शिवसेनेचे (उबाठा) नगरसेवक होते. यावेळी ते शिंदेसेनेकडून विजयी झाले आहेत. शरद फडोळ या भाजपच्या उमेदवाराने पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून, ते विजयी झालेे आहेत.
BJP and Shiv Sena get equal seats for Shinde group
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…