मुंबईच्या बदल्यात शिंदेसेना घेणार महत्त्वाची पदे?
भाजपकडून चाचपणी सुरू
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 72 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपकडून महापौदपदाचे नाव जाहीर करण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. दरम्यान, मनपा निवडणुकीत स्वबळावर लढणारी शिंदेसेना व राष्ट्रवादी (अ.प.) दोन्ही पक्ष भाजपसोबत मनपाच्या सत्तेत जाण्याचे संकेत मिळत आहे. मित्रपक्षांना विशेषत: शिंदेसेनेला कोणती पदे द्यावी लागतील, याबाबतची चाचपणी सुरू असल्याची जोरदार चर्चा नाशकात होते आहे. शिंदेसेना सत्तेत सहभागी झाल्यास उपमहापौर व दोन वर्षांकरिता स्थायी सभापतिपद, प्रभाग सभापती आदी महत्त्वाची पदे दिली जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये भाजपा मनपाचा एकहाती कारभार चालवू शकते. त्यांनी बहुमताचा आकडा सहज पार करून अधिकचे नगरसेवक निवडून आणले आहेत. परंतु, मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच अद्याप बाकी आहे. मुंबईत शिंदेसेनेशिवाय भाजपचा महापौर बसणे शक्य नाही. त्यामुळे मुंबईत भाजपला पाठिंबा देऊन तेथेही सत्तेत सहभागी होऊन महत्त्वाची पदे मिळवायची अन् इकडे नाशिक महापालिकेतदेखील चांगली पदे पदरात पाडून घ्यायची, अशी रणनीती शिंदेसेनेची असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपदेखील यास अनुकूल असल्याचे बोलले
जात आहे.
नाशिकच्या स्थानिक भाजपच्या नगरासेवकांचा यास विरोध आहे. मात्र, मुंबई महापालिका व भविष्यातील राजकीय गणिते पाहता भाजप हायकमांड नाशिकमध्ये एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमत असतानाही शिंदेसेनेला घेण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे का? अशी चर्चा रंगली आहे. शिंदेसेनेबरोबर चार जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी (अ.ज.) पक्षालाही सत्तेत वाटा दिला जाण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेत मंत्री गिरीश महाजन हेच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेनेने 26 जागांवर त्यांचे नगरसेवक निवडून आणले आहेत.
नाशिक महापालिकेत युतीमध्ये काम करताना निश्चित आवडेल, परंतु ही युती सन्मानपूर्वक व्हायला हवी. याबाबतचा निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल.
– अजय बोरस्ते, उपनेते, शिंदेसेना तथा गटनेते, मनपानाशिक महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) गट आम्ही एकत्र काम करावे, असे आमचे मत आहे. केंद्रात-राज्यात तिन्ही पक्ष सत्तेत असून, एकत्र आहोत. त्यामुळे नाशिक महापालिकेतही महायुती म्हणून एकत्र काम करावे, असे आम्हाला वाटते.
– सुनील केदार, भाजप, महानगर जिल्हाध्यक्ष
BJP-Shinde Sena-Nationalist together in the Municipal Corporation?
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…