महाराष्ट्र

भाजप सविधान संविधान संपवू पाहतेय



काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची घणाघाती टीका

नाशिक : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटींचा खर्च केला. यात त्यांना यशही आले. देशाला नेतृत्व नसल्याचे सांगत मोदी यांनी खोटी आश्वासने देशाला दिली आणि फसवणूक केली. कॉग्रेस 2014 पर्यत सत्तेवर असताना देशावर 43 हजार कोटींचे कर्ज होते. मात्र आता देशावर तब्बल 1 लाख 9 हजार कोटींचे कर्ज झाले आहे. केंद्राचे महागाई, बेरोजगरी याकडे दुर्लक्ष करत असून भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपविण्याच्या मार्गावर असल्याची घणाघाती टीका कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

मेनरोड येथील कॉग्रेस कार्यलयात मंगळवारी (दि.24)
पटोले आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्याना मार्गदर्शन करत होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, माजी नगरसेवक शाहु खैरे, डो. हेमलता पाटील, आशा तडवी, बबलू खैरे, कॉग्रेस सेवा दल डॉ. वसंत ठाकुर, वत्सला खैरे, राहुल दिवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पटोले यांनी भाजपवर चौफेर हल्ला केला. ते म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित नाही. केद्राने महागाइ, बेरोजगारी याकडे लक्ष द्यायला हवे त्याकडे न देता संविधान संपवण्यासाठी सोयीस्कर प्रयत्न सुरु आहे. त्यासाठीच राहुल गांधी यांनी कश्मिर ते कन्याकुमारी पर्यत भारत जोडो यात्रा काढली आहे. चौता स्तंभ पत्रकारितेला म्हनत असलो तरी सध्या या स्तंभावरच मोदींनी घाव घालत गोदी मीडियाच करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कांद्यासह कापसाला भाव नाही, कारण शेतकरी संम्पला पाहिजे हा यांचा उद्देश आहे. मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असताना लोकांच्या भावना दाखवत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
डॉ. बाबासाहेबानी दिलेले सविधान संपविण्याचे काम भाजप करत असताना मात्र हा देश आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी झगडत आहे. त्यांना कोट्यावधी भारतीयांचा प्रतिसाद मिळत आहे. मुळात भाजपाला पुरोगामी विचार संपावयचे असून त्या जागी त्यांचे धोरणे राबवायचे आहे. आणि गुलाम व्यवस्था प्रस्थापीत करायची असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. बाबासाहेबांना शिक्षणाला वाघीनीचे दूध म्हटले, परंतु हे शिक्षणच मिळू नये याकरिता भाजप प्रयत्नशील आहे. मुद्दामून पटसंख्येचा मुद्दा समोर आनला जातोय, कारण भाजपला शिक्षण नको, नोकरीं द्यायची नाही. उलट देशात कृत्रिम महागाइ वाढवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्या आपल्याला नक्कीच चांगले दिवस येतील याकरिता प्रामाणिकपनाने काम करत रहा. अशा सूचना त्यांनी दिल्यात.


भाजप म्हणजे जुमला पार्टी

नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप करताना भाजपा म्हणजे भाजपा जुमला पार्टी असल्याची जळजळीत टीका केली. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मुठभर लोकांचे आहेत. जेव्हा देशात कोरोना असताना केद्रातील सरकार अशा महामारीच्या प्रसंगी मध्य प्रदेश सरकार पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
………………

देशात कोरोना मोदींमुळे
सर्व जग आणि जागितक आरोग्य संघटनांनी भारताला आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याच्या सूचना देत होते. मात्र केवळ ट्रम्प यांच्यासाठी गुजरातमध्ये त्यांना पायघड्या घालण्यात आल्या. तेव्हापासूनच देशात कोरोना फोफावला. त्यामुळे देशातील कोरोनाला पंतप्रधान नरेद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केला.



Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago