अनपेक्षित चेहरा, इच्छुकांना धसक
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविलेला भाजप एक-दोन दिवसांत महापौरपदाचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निघल्याने पक्षात लॉबिंगला सुरवात झाली आहे. महापौरसाठीची संभाव्य काही नावे गुरुवारपासून चर्चेत येत आहेत. मात्र, असे असले, तरी पक्षाकडून ऐनवेळी नवा चेहरा समोर आणण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपमधील या धक्कातंत्राचा लॉबिंग करणार्यांनीदेखील धसका घेतल्याचे बोलले जात आहे.
भाजपने 122 पैकी 72 जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. शिंदेसेनेला कुठलीही हालचाल करण्याची संधी भाजपने ठेवली नसल्याने सर्वकाही एकट्या भाजपच्या हाती आले आहे. शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर पदाशिवाय स्थायी सभापती, उपमहापौर, सर्वाधिक स्थायी सदस्य व विभागीय प्रभाग सभापती भाजपकडे येणार आहे. तत्पूर्वी, महापौरपदाचे नाव जाहीर केले जाणार आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडण्याची शक्यता असताना अनपेक्षितपणे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण सोडत निघाल्याने अनेकांना महापौरपदाचे स्वप्न पडून लागले आहे. महिला नगरसेवकांच्या पती व कुटुंबातील सदस्यांकडून थेट वरिष्ठांकडे सेटिंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी अद्याप कोणालाही आश्वासन न देता संबंधितांना वेट अॅड वॉचच्या सूचना करत आहेत. काहींकडून एवढी घाई केली जात आहे की, विविध मार्गाद्वारे मंत्री व मुंबईत वजन टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
मंत्री महाजनच नाव ठरवणार
भाजपने नाशिक महापालिकेची निवडणूक मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीच लढली आणि ती यशस्वीपणे पार पाडत त्यांनी भाजपला स्पष्ट बहुमतही मिळवून दिले. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपत गोंधळ उडाला होता. परंतु त्याचा भाजपवर काहीएक परिणाम झाला नाही. दरम्यान, महापौर, स्थायी समिती सभापती व इतर महत्त्वाच्या पदांसाठी आपल्या समर्थकांना संधी मिळावी, अशी इच्छा पक्षाच्या तीनही आमदारांची आहे. पण कोणाला कोणते पद द्यायचे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मंत्री महाजनांच्या हाती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाच्या नावाची घोषणा होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…