नाशिक

भाजपची सिन्नर शहर, युवा मोर्चा व ठाणगाव मंडळ कार्यकारिणी जाहीर

संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकार्‍यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सिन्नर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या शहर, युवा मोर्चा आणि ठाणगाव मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. संपर्क कार्यालयाजवळील हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘मन की बात’ तसेच एसआयआर मोहिमेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल कार्यकर्त्यांनी जल्लोषही केला.
जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी भाजपवरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. पश्चिम बंगालमधील सत्तांतर हे तेथील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे नमूद करत आगामी निवडणुकांतही पक्षाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
युवानेते उदय सांगळे यांनी बूथस्तर मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गाव व प्रभागात एसआयआरची कामे प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करत तरुणांनी संघटन बळकटीसाठी झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमात ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, रणजीत देशमुख, भाऊसाहेब शिंदे, सुनील माळी, बहिरू दळवी, सजन सांगळे, हेमंत वाजे आणि भारत कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले.
युवा मोर्चा कार्यकारिणी ः
नीलेश लोणारे (कार्याध्यक्ष), भिकन राजपूत, नवनाथ आव्हाड, सिद्धेश भुसा (उपाध्यक्ष), कृष्णा वरंदळ (सरचिटणीस).
ठाणगाव-चास
मंडळ कार्यकारिणी ः
संजय शिंदे, तुकाराम भाबड, डॉ. राजेंद्र बिन्नर, सचिन पवार, प्रशांत हगवणे (उपाध्यक्ष), राजेंद्र शेळके, गणेश गवळी (सरचिटणीस).

शहर मंडळ कार्यकारिणी

शैलेश नाईक, मनीषा भालेराव, योगेश जाधव (उपाध्यक्ष), तुकाराम रेवगडे, नितीन परदेशी, स्मिता भंडागे (सरचिटणीस), शुभम येलमामे, अनिल नागरे, शेखर डांगे, वैभव भाटजिरे (चिटणीस), योगेश सानप (कोषाध्यक्ष), रमेश डुंबरे (कामगार आघाडी), दीपक मोरे (अनुसूचित जमाती आघाडी).

BJP’s Sinnar City, Yuva Morcha and Thangaon Mandal Executive Committees announced

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago