नाशिक

नाशिकमध्ये पेट्रोल ₹2.73 तर डिझेल ₹2.81 ने महाग

नाशिकमध्ये पेट्रोल ₹2.73 तर डिझेल ₹2.81 ने महाग

१० दिवसांत चौथी दरवाढ, वाहनधारकांवर वाढता भार

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरात सोमवार (दि. २५ मे) पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹2.73, तर डिझेलच्या दरात ₹2.81 इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर ₹109.74 वरून ₹112.47, तर डिझेलचा दर ₹96.30 वरून ₹99.11 प्रति लिटरवर पोहोचला आहे. हे दर नाशिक शहरासाठी असून, संबंधित कंपनी व पेट्रोल पंपाच्या लोकेशननुसार सुमारे १५ पैशांपर्यंत फरक असू शकतो.
याआधी नाशिकमध्ये इंधन दरवाढ दि. २३ मे रोजी झाली होती. त्या वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी सुमारे ९० पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी दि. १९ मे रोजी देखील जवळपास ९० पैशांची वाढ, तर दि. १५ मे रोजी तब्बल ₹३ प्रति लिटरची मोठी वाढ करण्यात आली होती. अशा प्रकारे गेल्या १० दिवसांत ही चौथी दरवाढ ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, रुपयाचे अवमूल्यन आणि पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे तेल विपणन कंपन्यांकडून सातत्याने इंधन दरवाढ केली जात असल्याचे सांगितले जात आहे. देशभरात आजच्या वाढीनंतर पेट्रोलमध्ये ₹2.61 आणि डिझेलमध्ये ₹2.71 प्रति लिटर वाढ नोंदवली गेली आहे.

या सततच्या दरवाढीमुळे खासगी वाहनधारक, मालवाहतूक व्यवसाय तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, पुढील काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक खर्चातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

18 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

19 hours ago