नाशिक

स्थायीत भाजपचे ‘पूर्व’ला झुकते माप

महापौरांकडून सोळा सदस्यांची नियुक्ती; सभापती निवडीकडे लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समिती सदस्यपदी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सोळा नगरसेवकांची घोषणा केली. दरम्यान, या नियुक्तीत सर्वाधिक नऊ सदस्य भाजपच्या वाट्याला आले. यात पक्षाने पूर्व विधानसभेला झुकते माप दिल्याचे दिसून आले. याखालोखाल शिंदेसेना चार, उद्धवसेना दोन तर राष्ट्रवादीला एक सदस्य आहे.
नाशिक मनपाची सोमवारी (दि.16) महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्या उपस्थितीत महासभा झाली. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक झाली. त्यानंतर सोमवारी स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्याच दिवशी स्थायी सदस्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम होता. परंतु, सर्वपक्षीय गटनेत्यांकडून स्थायी सदस्यांची नावे प्राप्त न झाल्याने महासभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले. स्थायी सदस्यांसाठी कोणाची वर्णी लागते, याकडे भाजपच्या नगरसेवकांचे लक्ष लागून होते. सोबतच शिंदेसेनेतही कोणाला संधी मिळेल, याकडे इच्छुकांच्या नजरा होत्या. मनसे शिंदेसेनेसोबत गेल्याने मयुरी पवार व राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना संधी मिळणार हे निश्चित होते. तर उद्धवसेनेकडून भारती ताजनपुरे व योगेश गाडेकर यांना संधी दिली जाणार असल्याचे निश्चित होते. परंतु, भाजप व शिंदेसेनेतील कोणत्या नगरसेवकांना संधी मिळेल, हे गुलदस्त्यात होते. सोमवारी नियुक्ती करून यावर पडदा टाकण्यात आला.

पक्षनिहाय स्थायी सदस्य
भाजप (9) सरिता सोनवणे, इंदुबाई खेताडे,
मच्छिंद्र सानप, जयश्री गायकवाड, माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, आदिती पांडे
शिंदेसेना (04) किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे, मयुरी पवार (मनसे)
राष्ट्रवादी (अजित पवार) (01) मुकेश शहाणे (अपक्ष)
उद्धवसेना (02) योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे

प्रभागनिहाय सदस्यसंख्या
नाशिकरोड – 5      पंचवटी – 3
सिडको – 3           सातपूर – 2
पूर्व – 3                 पश्चिम – 0

BJP’s stance is leaning towards the ‘East’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago