नाशिक

मर्दानी खेळांनी दुबईत उमटवली महाराष्ट्राची छाप

‘शिवसृष्टी शिवजयंती’ उत्साहात साजरी

नाशिक : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुबई येथे ‘शिवसृष्टी शिवजयंती 2026’ हा भव्य आणि दिमाखदार उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात नाशिकच्या नाशिक रॉयल वॉरिअर मर्दानी खेळ वारसा संस्कृती संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत महाराष्ट्राच्या पारंपरिक मर्दानी खेळांचे प्रभावी सादरीकरण केले.
या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे तब्बल 51 हून अधिक मावळ्यांना दोन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देऊन सादर करण्यात आलेले भव्य प्रात्यक्षिक. यूएईमध्ये पहिल्यांदाच शिवकालीन परंपरेशी निगडित मर्दानी खेळ इतक्या व्यापक स्वरूपात सादर करण्यात आले. तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी-काठी, भाला अशा विविध युद्धकलेच्या प्रकारांनी प्रेक्षक अक्षरशः रोमांचित झाले. प्रत्येक सादरीकरणात शिस्त, ताकद, चपळता आणि परंपरेचा अभिमान ठळकपणे दिसून आला.
या मावळ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नाशिकचे कल्पेश भालेकर, प्राची चंडालिया, क्रूना पटेल आणि राहुल राजगिरे यांनी समर्थपणे पार पाडली. दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी काटेकोर सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि पारंपरिक शस्त्रकलेचे बारकावे शिकवत मावळ्यांना सुसज्ज केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेले प्रात्यक्षिक हे केवळ खेळ न राहता शिवकालीन शौर्यगाथेचे जिवंत चित्रण ठरले. कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेतले ते केवळ 10 वर्षांच्या ‘शिवकन्या’ आद्या मेघा निखिल देव हिने. नाशिकहून दुबईत जाऊन तिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण आणि जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लहान वयात दाखवलेले धैर्य, एकाग्रता आणि परंपरेप्रति असलेली निष्ठा यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. तिच्यासोबत कल्पेश भालेकर आणि राहुल राजगिरे यांनीही दमदार प्रात्यक्षिक सादर करत महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा गौरव वाढवला. या भव्य सोहळ्याला दुबईतील भारतीय समुदायासह विविध देशांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ‘शिवसृष्टी शिवजयंती 2026’च्या निमित्ताने दुबईत महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि शौर्याचा झेंडा अभिमानाने फडकला असून, नाशिकच्या मर्दानी खेळांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ठळक ओळख निर्माण करत महाराष्ट्राच्या संस्कृतीची दणदणीत छाप
उमटवली आहे.

Men’s sports left a mark of Maharashtra in Dubai

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago