रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आज जागतिक रक्तदाता दिवस

नाशिक : प्रतिनिधी
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे . रक्तादानामुळे लाखो लोकांना जीवदान मिळते . मात्र असे असले तरी रक्तदानाचे लोकांना अजूनही महत्त्व समजले नाही . अथवा रक्तदानाविषयी असलेल्या अनेक संभ्रमामुळे नागरिक रक्तदान करण्याचे टाळत असतात . त्यामुळे आजही रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे . हीच बाब लक्षात घेत समाजात रक्तादानाविषयी जनजागृती करण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटना ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ) १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करते . रक्तदान संकल्पनेला शास्त्रशुध्द पध्दतीने माडंगारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते प्राप्त डॉ . कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमीत्त जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो .
कोरोना काळात रक्तदानाचे महत्त्व पटले . कोरोना बाधितांना जरी रक्ताची आवश्यकता नसली तरी प्लाइमाच्या माध्यमातून उपचार करण्यात येत होते . तसेच अपघातग्रस्त शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या रुग्णांना कोरोना काळात असलेल्या रक्ताच्या तुटवड्यामुळे जीव गमवावा लागला होता . कोरोना काळात रक्तदान शिबीरे बंद होती त्यात रुग्णालयात जाऊन रक्तदान करण्यास भीती वाटत असल्याने नागरिक
रक्तदान करण्याचे टाळत होते . त्यामुळे राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता . मात्र आता सर्व सुरळीत झाल्यानंतर रक्तदान शिबीरांचे प्रमाण वाढले आहे आणि विशेष म्हणजे रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाणही वाढली आहे . ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल . कोरोना काळात नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटल्याचे अधोरेखित होते .

यावर्षीची जागतिक रक्तदान दिनाची थीम आहे , रक्तदान हे एकजुटीचे कार्य आहे . प्रयत्नात सामील व्हा आणि जीव वाचवा . तसेच रक्तदात्यांची संख्या वाढवण्यासह रक्ताच्या गरजेवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात येणार आहे . त्यामुळे यंदाचा जागतिक रक्तदाता दिवस कोरोना काळानंतचा असल्याने रक्तदानाविषयी जनजागृती होण्यास मदत होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *