राज्यभरातील शाळा सुरु विदर्भात २७ जूनचा मुहूर्त

राज्यभरातील शाळा सुरु विदर्भात २७ जूनचा मुहूर्त

मुंबई : राज्यभरात काल १३ जूनपासून शाळा सुरु झाल्या . शिक्षण विभागाने यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली होती . शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा १३ जूनपासून सुरु होणार असल्याचे सांगितले . विदर्भात शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत . शाळा जरी १३ जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावे असं आदेशात म्हटलं होते . १३ आणि १४ जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता , सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे , असं आदेशात म्हटले आहे . शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटलंय . राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरु होणार असल्याचं म्हटलं होतं . तर १३ जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे , असं त्यांनी म्हटलं होतं .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *