गणेश बनकरांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत
दिक्षी : प्रतिनिधी
निफाड तालुक्याचे युवा नेते गणेश बनकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्व. अशोकराव बनकर पुरस्कृत नॅशनल हायवे मित्रमंडळ पिंपळगाव व गणेश बनकर मित्र परिवार निफाड तालुका यांच्या वतीने पिंपळगाव येथील हिंदकेसरी मैदानात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य स्पर्धेत संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून व राज्यभरातून सुमारे साडेचारशे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. अंतिम शर्यतीत बुलढाण्याच्या बॉबीडॉन-काशीडॉन या बैलजोडीने मुसंडी मारली आणि पिंपळगावच्या युवा हिंदकेसरी किताबावर आपले नाव नोदवले तर दुसर्या क्रमांकावर सोन्या व सोन्या जोडी, तिसरा क्रमांक बकासुर व बादशहा जोडी, चौथा क्रमांक सुंदर व सोन्या जोडी, पाचवा क्रमांक टायगर व विरा भाई जोडी, तर सहावी जोडी आदत सर्किट व बलमा जोडी तर सातवा क्रमांक लखन व खु. बैज्या या जोडीने पटकावला.
सुमारे लाखाच्या आसपास बैलगाडा स्पर्धकांनी व शौकिनांनी मैदान खचाखच भरले होते. पंचेचाळीस
फेर्यांमध्ये प्रत्येकी दहा बैलगाड्यांच्या शर्यतीत विजेता उपांत्य फेरीत दाखल झाला. उपांत्य फेरीतून त्यांनी अंतिम
फेरीत धडक मारली.
अटीतटीच्या अंतिम फेरीत विजयी रेषा काही फुटांवर राहिली असताना बकासुर-सोन्या बादशाहा आघाडीवर होते, पण अंतिम क्षणी बॉबीडॉन-काशीडॉन या बैलजोडीने मुसंडी मारली व पिंपळगावच्या युवा हिंदकेसरी किताबावर आपले नाव कोरले. सर्व प्रेक्षकांनी त्यास दाद देत या बैलजोडीची व बैलगाडा मालकाचे अभिनंदन करत
स्पर्धेची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार धनराज महाले, मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती विश्वास मोरे, प्रवीण जाधव, दिलीप मोरे, राजेंद्र डोखळे, सुनील बागूल, रवींद्र पगार, सतीश मोरे, राजेश पाटील, बापूसाहेब पाटील, ज्ञानेश्वर शिरसाठ, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, सागर कुंदे, राजेंद्र शिंदे, अनिल बोरस्ते आदींसह जिल्हाभरातील
प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…