शिक्षक निवडणुकीत बोगस मतदान : तीन केंद्रावर आढळल्या अतिरिक्त मतपत्रिका
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिक्षक निवडणुकीच्या मतमोजणीला अंबड येथील वेअर हाऊस मध्ये सुरवात होत आहे. दरम्यान पाच केंद्रावर बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे. निफाड, येवला व चोपडा येथील मत पेटीमध्ये मतपत्रिकापेक्षा अधिक मत पत्रिका आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नाही का असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान आ. किशोर दराडे यांच्या येवला येथील केंद्रावर एक व निफाड येथेही एक तर चोपडा येथील मत केंद्रावर तीन अशी एकूण पाच बोगस मतपत्रिका आढळून आल्या आहेत या तीनही मतदान केंद्राच्या पेट्या बाजूला ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सकाळी मत मोजणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे. एकूण तीस टेबल असून मतमोजणी पूर्ण होण्यास मध्यरात्री होणार आहे. महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, युतीचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात लढत होत आहे.