शिक्षक आमदारकीसाठी मतमोजणीला सुरुवात
नाशिक: प्रतिनिधी
शिक्षक मतदार संघातील मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. अंबड येथील वेयर हाऊस येथे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी केली जात आहे. एकूण 64 हजारहुन अधिक मतदार असलेल्या शिक्षक मतदार संघात 93.48 टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे, अपक्ष विवेक कोल्हे यांच्यातच खरी चुरस आहे. मतांचा कोटा ठरवण्यात येणार असून, त्यांनतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाला उशीर लागण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भेटवस्तू व पैसे वाटप करण्यात आल्याची चर्चा झडली होती. त्यामुळे कोण विजयी होतो याबद्दल मोठी उत्सुकता आहे.