नाशिक

देवळाली गावातील मंदिरात धाडसी चोरी; गुन्हा दाखल

नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी
देवळालीगावात पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन चोरट्यांनी धाडसी चोरी करत परिसरात खळबळ उडवून दिली. मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिकीची तोडफोड करून त्यातील हत्यारे (पान्हे) काढून त्याच हत्यारांच्या सहाय्याने दोन मंदिरांमध्ये चोरी करण्यात आली. या घटनेत सार्वजनिक पारावर असलेल्या पंच कमिटीच्या श्री सूर्यमुखी गणपती मंदिरातील सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरट्यांनी लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या दोन रिक्षांच्या डिकी फोडून चोरट्यांनी त्यातील हत्यारे काढली. त्यानंतर देवळाली गावातील मुख्य चौकात असलेल्या श्री सूर्यमुखी गणपती मंदिराच्या जाळीदार दरवाजाची तोडफोड करून मंदिरात प्रवेश करण्यात आला. श्री गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट चोरून नेण्यात आला. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली.
यानंतर चोरट्यांनी दांड्या मारुती मंदिरात जाऊन तेथील दानपेटी फोडून रक्कम चोरली. या चोरीनंतर परिसरात दहशत निर्माण व्हावी, या उद्देशाने रिक्षांची तोडफोड करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या संपूर्ण घटनेदरम्यान परिसरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. त्या फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात चोरीचा प्रकार आल्यानंतर त्यांनी तत्काळ देवळालीगाव पंच कमिटीच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असून, वारंवार होणार्‍या चोर्‍यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढवावी व सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मंदिरासमोरच पोलीस चौकी असतानाही चोरी झाली. ही पोलीस चौकी त्यावेळी बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही चौकी नेहमीच बंद असते, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक पारावर आणि चौकात कायम वर्दळ असते.

Bold theft in temple in Devlali village; Case registered

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

5 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

5 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago