पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन कोटी 88 लाखांंचा मुद्देमाल जप्त
सिडको : प्रतिनिधी
बीएसएनएल आणि महावितरण कंपनीच्या महागड्या भूमिगत केबलची चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले आहेे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे दोन कोटी 88 लाख 40 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हेशाखा युनिट-1, गुंडाविरोधी पथक आणि अंबड गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली.
नाशिकरोड परिसरात 2024 मध्ये बीएसएनएल कार्यालयाजवळील भूमिगत कॉपर व अॅल्युमिनियम केबल चोरीप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हेशाखा युनिट-1 कडे असताना अटक आरोपींकडून चौकशीदरम्यान चोरीचा माल मुंबईतील भांडुप येथील गोदामात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भांडुप येथील गोदामावर छापा टाकला. या कारवाईत साडेसतरा टन विविध प्रकारच्या अॅल्युमिनियम केबल वायर, साडेचौदा टन जेलीफील्ड वायरमधून वेगळे केलेले कॉपर, तसेच दीड टन अॅल्युमिनियम केबल वायर, असा एकूण दोन कोटी 88 लाख 40 हजारांंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात वाहाब अब्दुल नवाज, सुरेश दिलीप वैराळ, बसंतलाल राजाराम यादव, कमलेशकुमार सुखदेव रविदास, तनवीर मुफसीर शेख आणि राजकुमार केशुलाल जैन यांना अटक करण्यात आली आहे.
या तपासादरम्यान आरोपींकडून सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील केबल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, देवीदास ठाकरे, उत्तम पवार, नाझीमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, श्रीकांत सूर्यवंशी, सुनील भोसले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाठ, चालक पोलीस हवालदार दीपक पाटील, दीपक दिवटे आणि चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी सहभाग घेतला.
गुंडाविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, राजेश राठोड, कल्पेश जाधव, गणेश भागवत व त्यांच्या पथकाने, तसेच अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, भूषण सोनवणे आणि भगवान जाधव यांनीही कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट-एक करीत आहे.
BSNL-Mahavisitaran cable theft; six arrested.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…