नाशिक

द्वारका, सारडा सर्कलवरील 60 अतिक्रमणांवर बुलडोझर

अतिक्रमणची तिसर्‍या दिवशीही कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, रविवारपासून द्वारका परिसरात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 17) सलग तिसर्‍या दिवशी अतिक्रमण विभागाने कारवाई करत द्वारका सर्कल ते सारडा सर्कल, तसेच शालिमार, गंजमाळ आदी
भागांतील 60 अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला.
मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्ण दखणे, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात मंगळवारी सकाळी अकरापासून ही मोहीम सुरू करण्यात आली.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनपा व शहर पोलीस दलाच्या वतीने द्वारका व परिसरात अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत अनधिकृत फलक काढून अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. टपर्‍या हटविण्यात आल्या. काही ठिकाणी नागरिकांनी या अतिक्रमण मोहिमेला विरोध दर्शवला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मोहीम नियमित सुरू ठेवली. रविवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्तात द्वारका ते मुंबईनाका भागात जोरदार कारवाई करून 88 अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यामुळे द्वारका चौक मोकळा झाला. दुसर्‍या दिवशीही सोमवारी द्वारका, सारडा सर्कल आदी भागातील 55 टपर्‍या व 26 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्याने अनेकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढले आहे. दरम्यान, महापालिकेने हाती घेतलेली अतिक्रमण मोहीम न थांबवता सुरूच ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

31 minutes ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

35 minutes ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

40 minutes ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

48 minutes ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

1 hour ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

1 hour ago