नाशिक

नियोजनात सर्व विभागांची महत्त्वाची भूमिका : डॉ. प्रवीण गेडाम

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा आयोजनामध्ये सर्व विभागांची महत्त्वाची भूमिका आहे. संबंधित विभागांनी या सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाला परिपूर्णता आणण्यासाठी त्यातील प्रस्तावामधील बाबी पुन्हा तपासाव्यात आणि ते अचूक होतील याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना विभागीय आयुक्त तथा नाशिक, त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केली.
नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत व नाशिक विभागातील इतर क्षेत्रांमध्ये होणार्‍या कुंभमेळा व संलग्न उपक्रमांचे आयोजन व व्यवस्थापनासाठी प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी झाला. या प्राधिकरणाची पहिली बैठक विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्राधिकरणाच्या सहअध्यक्ष तथा मनपा उपायुक्त करिश्मा नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक आरोग्य, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, लेखा व कोषागारे, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी, डॉ. गेडाम म्हणाले की, ही प्राधिकरणाची पहिलीच बैठक आहे. या अनुषंगाने सर्व विभागांची एकत्रित बैठक ही नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी या सोहळा कालावधीत करावयाच्या कामांचे नियोजन तयार केले आहे. त्यात अधिक अचूकता येण्यासाठी त्यातील महत्त्वाच्या बाबींवर आता अधिक व्यापक प्रमाणात लक्ष देणे आवश्यक आहे.
या बैठकीत कुंभमेळा अनुषंगाने करावयाच्या विविध कामांबाबत चर्चा झाली. त्यात आतापर्यंत प्रसिद्ध केलेल्या रुपये 4 हजार कोटींच्या निविदा लवकरात लवकर अंतिम करून कार्यारंभ देणे आणि रक्कम रुपये 2 हजार कोटींच्या प्रगतीपथावर असणार्‍या निविदा तत्परतेने निर्गमित करण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी संबंधित
यंत्रणेला दिले.

कुंभमेळा कक्ष अधिक व्यापक होणार

सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाच्या कामातील सुसूत्रतेसाठी यापूर्वीच कुंभमेळा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तो अधिक विस्तृत आणि व्यापक करून नियोजन आणि अंमलबजावणी, गुणवत्ता नियोजन आणि समन्वय या बाबींकडे अधिक लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.

कुंभमेळा प्राधिकरणासाठी कार्यालय लवकरच

कुंभमेळा प्राधिकरणासाठी कार्यालय सुरू करण्याबाबत आणि त्यासाठी जागेची निवड करण्याबाबत डॉ. गेडाम यांनी उपायुक्त करिश्मा नायर यांना सांगितले. मध्यवर्ती ठिकाणी असणारे, समन्वय आणि नियोजनासाठी सर्वांना सुलभ असेल अशी जागा निवडावी, असे त्यांनी सांगितले.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago