अतिक्रमणची तिसर्या दिवशीही कारवाई
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, रविवारपासून द्वारका परिसरात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 17) सलग तिसर्या दिवशी अतिक्रमण विभागाने कारवाई करत द्वारका सर्कल ते सारडा सर्कल, तसेच शालिमार, गंजमाळ आदी
भागांतील 60 अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला.
मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त सुवर्ण दखणे, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात मंगळवारी सकाळी अकरापासून ही मोहीम सुरू करण्यात आली.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मनपा व शहर पोलीस दलाच्या वतीने द्वारका व परिसरात अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत अनधिकृत फलक काढून अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. टपर्या हटविण्यात आल्या. काही ठिकाणी नागरिकांनी या अतिक्रमण मोहिमेला विरोध दर्शवला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून ही मोहीम नियमित सुरू ठेवली. रविवारी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्तात द्वारका ते मुंबईनाका भागात जोरदार कारवाई करून 88 अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यामुळे द्वारका चौक मोकळा झाला. दुसर्या दिवशीही सोमवारी द्वारका, सारडा सर्कल आदी भागातील 55 टपर्या व 26 दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्याने अनेकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढले आहे. दरम्यान, महापालिकेने हाती घेतलेली अतिक्रमण मोहीम न थांबवता सुरूच ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…