नाशिक

बुलेट चोर व खरेदी करणार्‍याला अटक

नाशिक शहरातील बुलेट चोरीचे 6 गुन्हे उघड

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते.त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शहरात विविध ठिकाणांहून बुलेट चोरीची कबुली दिली. यावेळी संशयिताकडून सुमारे 6 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 6 बुलेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. 28 मे रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी शिवार येथून रात्री 10 वाजेच्या सुमारास बुलेट मोटारसायकल चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व त्यांच्या पथकाने परिसरातील सुमारे 35 सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताची ओळख पटवली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अभय सुरेश खर्डे (वय 23, रा. झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) हा एकलहरा रोडवर बुलेट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्याला गवळीबाबा देवस्थानजवळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक बुलेट (क्र. एमएच 15 जीवाय 6935) व 15 हजारांचा मोबाइल असा एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात त्याच्याविरुद्ध नाशिक शहरात एकूण 6 बुलेट चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या संशयिताकडून एकूण 6 बुलेट व मोबाइल असा 6 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच, चोरीची बुलेट खरेदी करणारा अनिकेत शिरीष पठारे (वय 25, रा. दापोडी, जि. पुणे) यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आले आहे की, आरोपी अभय सुरेश खर्डे याच्यावर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 18 बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्र. 2 चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, अतुल पाटील, परमेश्वर दराडे, वाल्मीक परदेशी, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार यांनी केली आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago