घातक शस्त्रसाठ्यासह पोलिसांची कारवाई
सिडको विशेष प्रतिनिधी :
अंबड परिसरातील घरकुल योजना, चुंचाळे शिवार येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई 6 जूनच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपींकडून घातक शस्त्रे व संशयास्पद साहित्य हस्तगत करण्यात आले असून, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सपोनि भंडे आणि पोशि जाधव यांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला आहे.अटक आरोपींची नावे गौरव गणेश लहामटे (24 वर्षे), शाम बाबासाहेब जाधव (19 वर्षे), रवी गजानन गवई (25 वर्षे), लक्ष्मण राजेंद्र कोळी (25 वर्षे),सर्वजण रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासह इतर 3 साथीदारांचा शोध सुरू आहे.
आरोपी यांनी रोजी पहाटे 3.03 वाजता अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पोनि कारंडे आणि सपोनि भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हांडे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे 320 रुपये किमतीचा दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. त्यामध्ये हिरव्या मुठीचा स्क्रू ड्रायव्हर, मिरची पावडरची पुडी, 15 फूट दोरी, लोखंडी पक्कड, निळ्या रंगाची प्रगती ड्रेसेस नाव असलेली कापडी पिशवी आणि एक 31 इंच लांबीची कटावणी (गज) यांचा समावेश आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…