नाशिक : प्रतिनिधी
शहरातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याचे चित्र आहे.शहरातील पेठ रोड परिसरातील सराफ दुकानाचे कुलूप अज्ञातानी तोडून सोन्याचे दागिने व चांदी असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरल्याची घटना उघकडीस आली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ,फिर्यादी वैभव बबनराव भोसले (रा.ओमंकार दर्शन अपार्टमेंट, मेहेरधाम पंचवटी) यांचे पेठ रोडवरील बच्छाव हाॅस्पिटल समोर प्रसिद्धी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या बंद दुकानाचे कुलूप तोडून चोरी केली. यात सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन किलो चांदी असा सुमारे 4 लाख 5 हचार रूपये किमतीचा ऐवज घरफोडी करून नेला. ही घटना काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञा चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करीत आहेत.