नाशिक

साकोरा येथे घरफोडी; 20 तोळे सोने लंपास

पळाशी : वार्ताहर

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गावात पुन्हा घरफोडी झाली. त्यात बंद असलेल्या घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी सुमारे 20 तोळे सोन्याचे व 72 भार चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोकड लंपास केली. याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
साकोरा येथील निवृत्त रेल्वे कर्मचारी सुरेश नंदा बोरसे यांच्या बंद घरात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून कपाटाचे लॉक तोडले. त्यातील पट्टीपोत, शॉर्टपोत, चेन, अंगठ्या, नेकलेस, ओमपान, काळी पोत, पांचाळी, तोंगल, साधी पोत, डोरलं, पुतळ्या आदी सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच दनकडे, तोडल्या, जोडवे, अंगठ्या आदी चांदीचे दागिने आणि पाच हजार रुपये रोकडही लंपास केली. सकाळी मंगल बोरसे यांनी घरात प्रवेश केल्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले.
दरम्यान, काही अंतरावर कुसुम अनंत चव्हाण यांच्या घराचे कुलूप व कोयंडाही कापल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरट्यांनी आणखी घरांना लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे. साकोरा परिसरात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यामुळे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोर्‍यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी. चोरीचा तपास करावा, अशी मागणी होत आहे.

Burglary at Sakora; 20 tolas of gold stolen.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago