दि. 11 ते 17 ऑक्टोबर 2026

मेष : आर्थिक आवक चांगली

या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. त्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. आपले मत कोणावरही लादण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय कोणत्याही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका. इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. व्यावसायिक जबाबदारी पार पाडाल. नोकरदार वर्गाला कामाकडे पूर्णपणे लक्ष देता येईल. खर्च कमी होईल.

वृषभ : आर्थिक लाभ होईल

या सप्ताहात प्रयत्नांना यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होतील कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. आपले काम ठरवल्याप्रमाणे आणि वेळेत पूर्ण होईल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होईल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. ताणतणाव कमी होईल. आरोग्यात सुधारणा होईल.

मिथुन : आर्थिक चिंता मिटतील

या सप्ताहात बर्याच काही गोष्टी तुम्हाला अनपेक्षित असतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम आहे. व्यवसायात भरभराट होईल. नोकरदार वर्गाचे कामाकडे लक्ष लागेल. आर्थिक चिंता मिटेल. राजकीय क्षेत्रात चांगले बदल होतील. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांना मदत कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य सांभाळा.

कर्क : आर्थिक सुबत्ता मिळेल

या सप्ताहात ग्रहमान अनुकूल असल्याने त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींना वेळ देता येणार नाही. सध्या आपण मनामध्ये एक ध्येय ठरवलेले आहे. ते ध्येय नक्कीच पूर्ण होणार. तुमचे स्थान मजबूत होईल. नोकरदार वर्गाला कामातून थोडी शीतलता मिळेल. आर्थिक भार हलका होईल. राजकीय क्षेत्रात मन लागणार नाही.

सिंह : समाधान लाभेल

या सप्ताहात ग्रहमान अनुकूल असून, आर्थिक बाजू भक्कम होईल. तुमच्या कामाचे नियोजन केल्याने समाधान लाभेल. व्यवसायातील उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. खर्च कमी करा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोला. मनमोकळेपणाने मनमुराद आनंद कसा लुटता येईल हे पाहा. संततीसौख्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. विचार करून बोला.

कन्या : अडकलेले पैसे वसूल होतील

या सप्ताहात ग्रहमानाची साथ लाभणार असून, चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील. राजकीय व्यक्तींनी बोलताना शब्द जपून वापरा म्हणजे विपरीत परिणाम होणार नाहीत. आरोग्य चांगले राहील.

तूळ : संधी मिळेल

या सप्ताहात कामाचा व्याप वाढेल. बाकी दिवसांमध्ये चंद्रग्रहाचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील, त्यामुळे चांगल्या दिवसांमध्ये तुम्हाला संधी मिळेल. व्यवसायात मागील काही दिवस त्रासदायक गेले असले तरी सध्या मात्र चांगले दिवस आहेत. नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. राजकीय क्षेत्रात चांगल्या घडामोडी होतील. नातेवाईकांकडून शुभेच्छा मिळतील. भावंडांना मदत कराल. प्रकृती साथ देईल.

वृश्चिक : चांगल्या घडामोडी घडतील

या सप्ताहात ग्रहमान अनूकल आह.े चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक स्थिती चांगली राहील. सर्वच दृष्टीने हा सप्ताह चांगला राहील. पैशांची आवक वाढेल. संपत्तीचे नवीन स्त्रोत सुरू होतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिक अशा दोघांनाही हा सप्ताह अडचणींचा आहे. सतर्क रहा. आरोग्याची काळजी घ्या.

धनु : आरोग्य सांभाळा

या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी वाढतील. व्यापारी, व्यावसायिकांचे नफ्याचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पथ्यपाणी सांभाळूनच कामे करा. प्रवासात सावध रहा. विनाकारण कुणालाही शब्द देऊ नका.

मकर : यश प्राप्ती

या सप्ताहात चंद्रभ्रमणे चांगली आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरदारांची पदोन्नती होईल. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. आर्थिक भार हलका कसा होईल ते पाहा. आरोग्याची काळजी घ्या. इतरांना शब्द देणे टाळा.

कुंभ : विचार करून बोला

या सप्ताहात चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढेल. नोकरदारांना अडचणी सतावतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी बोलताना सावधगिरी बाळगा. व्यापारी व्यावसायिकांच्या इच्छा पूर्ण होतील. कोणतेही काम करताना सहनशीलता ठेवा. योग्य समन्वय साधा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. आरोग्य सांभाळा.

मीन : कामे जलद होतील

या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणी दूर होतील. व्यवसायिकदृष्ट्या उत्पन्न चांगले राहील. नोकरदार वर्गाला आपले मत वरिष्ठांसमोर मांडता येईल. आर्थिकबाबतीत काटकसर करा. मित्र परिवाराची मदत मिळेल. संततीसौख्य लाभेल. आरोग्य चांगले.

Weekly Horoscope

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

9 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

9 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

10 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

10 hours ago